कुंभकर्णी झोपेत असलेल्या सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येईल कधी.?नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष...


 
कुंभकर्णी झोपेत असलेल्या सुनगाव ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येईल कधी.?नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत हे साफसफाई कामांच्या दृष्टीने उदासीन दिसत असून सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे चित्र सुनगाव येथे दिसत आहे ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबके साचलेले आहे मध्ये डासांची उत्पत्ती झालेली आहे व ठीक ठिकाणी गवत हे वाढलेले आहे त्यामुळे गावात डासांचे प्रमाण वाढलेले आहे त्यावर तन नाशक फवारणी  करावी व गावात धूर  फवारणी करावी गावात मच्छरांचे प्रमाण खूप वाढलेले आहेत त्यामुळे डायरिया मलेरिया कॉलरा डेंग्यू इत्यादी प्राणघातक रोगांची लागण झालेली दिसत आहे या नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायत सूनगावने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे मागील वर्षी ही ग्रामपंचायत सुनगाव कडून सुनगाव मध्ये धूर फवारणी झालीच नाही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये जवळपास दूर फवारणी झालेली आहे त्यातच सतत वीस ते पंचवीस दिवस पाऊस चालू असताना गावात पावसाचे पाणी साचलेले जागोजागी  डबके  आहे त्यामध्ये डासांची मोठी उत्पत्ती झालेली आहे व सुनगाव येथे पोटाचे विकार व तापीचे आजार या रोगांनी सुनगाव पूर्णपणे ग्रासले आहे तरी पण सुनगाव ग्रामपंचायत कडून सुनगाव वासियांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही जसे पिण्याचे योग्य पाणी व धूर फवारणी तर ग्रामपंचायत करतच नाही त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन हे गाढ झोपेत गेलेले आहे व नागरिकांच्या आरोग्यांकडे पूर्ण दुर्लक्षच केलेले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.. तरी गटविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायतीला गावातील साफसफाई व पाण्यामुळे साचलेल्या डबक्यात मुरुम तसेच गावावर लागलेले कचऱ्याचे ढीग उचलून व वाढलेले गवत यावर तणनाशक फवारण्याच्या सूचना करण्यात याव्या.. असे सुनगांव येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Previous Post Next Post