शेगाव येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी... जयंती मिरवणुकीला आमदार डॉक्टर संजय कुटे यांची उपस्थिती...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने शेगांव शहर येथे डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती निमित्य भव्य मिरवणूक काढण्यात आली लहुजी शक्ती सेना युवा जिल्हा अध्यक्ष आशिष सावळे यांच्या नेतृत्वा मध्ये ही भव्य मिरवणूक म्हाडा कॉलनी येथून काढण्यात आली. या शोभा यात्रेत जळगाव जामोद मतदार संघांचे लोकप्रिय आमदार डॉ संजय कुटे यांनी सर्व प्रथम साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व मिरवणूकी ला सुरवात केली तसेच शेंगाव शहर चे ठाणेदार नितीन पाटील साहेब उपनिरीक्षक सपकाळ साहेब, भाजपा गट नेते शरद सेठ अग्रवाल, भाजपा माजी नगर सेवक गजानन जवंजाळ, भाजपा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांनी देखील मिरवणुकीमध्ये उपस्थिती दाखवून शोभा वाढवली.यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून रॅलीचा लहुजी वस्ताद चौक येथे समारोप करण्यात आला. मिरवणुकीमध्ये अबाल वृद्ध व महिला समाज बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते.मिरवणुकीसाठी सर्व समाज बांधवांनी पुढाकार घेतला.