वाघाच्या हल्ल्यात अमोना येथील एक ठार


 
वाघाच्या हल्ल्यात अकोट तालुक्यातील अमोना येथील एक वृद्ध ठार...

सैयद शैकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मौजे कासोद,शिवपूर,परिसरात अमोना या आदिवासी पुनर्वसित गावातील हिरालाल सोमा जामुनकर वय ५५ वर्ष हे राहणापूर शेत शिवारात इंधन आणण्यासाठी गेले असता.त्यांच्यावर वाघाने अचानकपणे हल्ला केल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.मयत वक्ती ही भूमिहीन आहे.तशामलाल नामदेव काकडे,पंच,मदन बाबूलाल बेलसरे,सरपंच,व्ही एम गायकवाड,वनपाल,डी के जाधव वनपाल,एस व्ही कहाळे,वनरक्षक,जी,पी,रेकडे,आर एफ ओ सोमठाना,वीर एकलव बचाव पथक पांडुरंग तायडे,शिवसेनेचे अकोला उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे  यांची उपस्थिती होती.या बाबतचा पंचनामा करून प्राथमिक अहवाल तलाठी यांनी तहसीलदार अकोट यांचेकडे दाखल केला असल्याची माहिती मिळाली अकोट ग्रामीण रुग्णालय येथे पोष्टमार्डम करण्यात आले.वाघाच्या हल्ल्यात अमोना येथील एक ठार झाल्यामुळे शेतकरी,मजूर,यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Previous Post Next Post