स्व. प्रमिला बाई देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाला १०००१ रू भेट..दान हे सत्पात्री असावे- देविदास शर्मा..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगाव शहरातील सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २४ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून अनेक धार्मिक व सामाजिक जनसेवा रूग्ण सेवा असे अनेक उपक्रम अखंडपणे निस्वार्थ पारदर्शक भावनेतून " मुख मे हो राम नाम , राम सेवा हाथ मे "हे ध्येय घेऊन कार्य करत आहे मुन्नाभाऊ यांचे पारदर्शक सेवा कार्य पाहून त्यांच्या या कार्याला खारीचा वाटा म्हणून भजनी मंडळाच्या संस्थापक एकनिष्ठ सदस्या मंडळ स्थापने आदी पासून मुन्ना शर्मा यांच्या सोबत राहुन प्रत्येक कार्यात तन, मन, धनाने पुढे राहुन सहभागी राहणाऱ्या स्व.प्रमिला बाई आनंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ प्रल्हाद देशमुख, विनोद देशमुख व देशमुख परिवाराच्या वतीने आज दिं ५-८-२०२४ रविवार रोजी भजनी मंडळा भजनाचे साहित्य घेण्या करिता व सामाजिक कार्या करिता दहा हजार एक रूपये देणगी देण्यात आली. या प्रसंगी भजनी मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, विनोद सुकाळे,अरूण कडवकर, दिलिप झापर्डे, प्रल्हाद भाऊ देशमुख,विनोद देशमुख, लालाजी सांगळे,बंटी देशमुख,विक्की देशमुख,दिपु देशमुख,आशाबाई अंधारे,पार्वतीबाई सुकाळे, मंगला बावस्कर, संगिता देशमुख,शालीनी ताई देशमुख, वर्षाताई देशमुख,गायत्री देशमुख,व देशमुख परिवार भजनी मंडळाचे सदस्य हजर होते अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली.