ई-पॉस मशीन जमा करून जळगांव रेशन दुकानदारांचा निषेध ...मशीन मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने दुकानदार त्रस्त...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
जळगांव जामोद तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशीनचे सर्वर मागील अनेक दिवसांपासून डाऊन होत आहे. त्यामुळे धान्य वाटप करण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी राशन दुकानदारांना लाभार्थ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.... जिल्ह्यातील अनेक गावात या कारणामुळे राशन दुकानदारांना लाभार्थ्यांकडून अयोग्य भाषेत शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडला आहे. तसेच मागील सात वर्षापासून रास्त भाव दुकानदाराच्या कमिशनमध्ये वाढ केलेली नाही यामध्ये सुद्धा वाढ व्हावी ही सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली आहे ...वारंवार निवेदन देऊन सुद्धा सरकार याकडे लक्ष देत नसल्याने राशन दुकानदार संघटना सरकारच्या धोरणावर तीव्र नाराज आहेत .... त्यामुळे सदर ई पॉश मशीन शासनाने जमा करून घ्याव्यात यासाठी पाच ऑगस्ट रोजी जळगांव जामोद तालुक्यातील राशन दुकानदार संघटनेकडून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील राशन दुकानदार संघटनेचे रंगराव देशमुख जिल्हा कार्यधक्ष्य,निलेश देशमुख जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष किशोर दाताळकर, जय चांडक, जगन्नाथ वायझोडे,वाल्मिक ठाकरे,शालीग्राम दाते,डी.वाय. पाटील,आर.व्ही.ठाकूर,एस.एल. हागे, आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.