अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल जळगांव जामोद तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
संसदीय विरोधी पक्ष नेते कांग्रेस चे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी संसदेत जाती नुसार जनगणना करावी अशी मागणी केली जिसकी जितनी जनसंख्या उतनी उनकी भागीदारी या विषयाला विरोध करीत खा अनुराग ठाकूर व खा कंगना राणावत यांनी राहुलजी गांधी यांना जातीवाचक व बेताल वक्तव्य केल्याबद्दल जळगाव जामोद काँग्रेस कमिटीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.सोबतच मोदी सरकार व भाजप सरकार मुर्दाबाद, अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांचा निषेध असो अशा घोषणा देऊन निषेध सुद्धा नोंदवण्यात आला.याप्रसंगी तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, माजी जि प अध्यक्ष प्रकाश पाटील, महिला काँग्रेसच्या प्रदेश सदस्य ऍड सौ ज्योतीताई ढोकणे, डॉ संदीप वाकेकर, सहकार सेलचे प्रदेश सचिव आसिफ इकबाल, शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, मा नगरसेवक श्रीकृष्ण केदार, शेषराव वंडाळे, वैभव गव्हाळे,प्रवीण भोपळे, अब्दुल जहीर, संजय येउल, संतोष गावंडे, अनिल इंगळे,प्रमोद तीतरे, संतोष खानझोडे,विलास कुकडे, अनंत झाल्टे, सुनील वानखडे, सुरेश वानखडे, रामेश्वर पाटील, परमेश्वर वानखेडे, प्रभुदास बंबटकार,अयाज पूनेवाला, गजानन पुंडे,सैयद तौफिक, बाबु जमदार,गजानन कोथळकर,शेख अफरोज, हुसेन राही,इम्रान खान, सुनील सोनावणे,किसन दमदार, अशोक साबे व असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.