सातपुडा शिक्षण संस्था व स्पंदन फाऊंडेशनच्या वतीने सातपुडा गरबा फेस्टिवल 2024 कार्यक्रम उत्साहात संपन्न..सांस्कृतिक कार्यक्रममातुन महीला व युवतीं मधील सुप्त गुण विकसित होतात. -डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर.
जळगाव जामोद प्रतिनिधी-
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा जळगांव जामोद तालुक्यातील महीलाना हक्काचं व्यासपीठ मिळाल पाहीजे यासाठी रविवार दि. 6 ऑक्टोबर रोजी सातपुडा शिक्षण संस्था व स्पंदन फाऊंडेशनच्या वतीने सातपुडा गरबा फेस्टिवल - 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.उर्मिलाताई इंगळे तर प्रमुख अतिथी सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.उज्वलाताई पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सौ. अलका दलाल, जळगांव जामोद पोलिस स्टेशनच्या पोलीस अधिकारी स्नेहा शेडगे , सौ.उर्मिलाताई पलन, सातपुडा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.गौरीताई सातव आदी महीला मान्यवर उपस्थित होत्या.सामाजिक व राजकीय जीवनात जिवन जगत असताना महीलांनी आपल्या स्वतःची काळजी व सुरक्षा कशा प्रकारे करायची याचे मार्गदर्शन स्नेहा शेडगे मॅडम यांनी आपल्या भाषणातून महीलांना मार्गदर्शन केले.यावेळी जळगांव जामोद तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा आपल्या विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्यांच्या सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सौ.संगीता बारेला, सौ.प्रमिला जाधव , सौ.शारदा मस्के, सै.शकीला बानो , सौ. शोभा खवणे, श्रीमती. पुष्पाताई कसुरकार, श्रीमती लताताई चव्हाण, कु .श्रुती आटोळे आदी महीलांचा सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमात महिलांना लाईव्ह ऑर्केस्ट्रा च्या माध्यमातून . सर्वांनी मनसोक्त पने गरबा फेस्टिवलचा आनंद लुटला.या कार्यक्रमाला जळगांव जामोद शहरातील व तालुक्यातील महीला व युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बेस्ट गरबा डान्सर(सोलो), बेस्ट गरबा ग्रुप डान्स ,बेस्ट वेशभूषा , बेस्ट ट्विनिंग , उखाणे स्पर्धा ,एक मिनिटाच्या सरप्राईज स्पर्धाअसे विविध बक्षीसे देण्यात आले. या स्पर्धेमध्ये डॉ.प्रेक्षा छाजेड व सौ.रुपा पलन पलन या परीक्षक होत्या,सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रक्षा गांधी व प्रा.जया सुरडकर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.मंगला मॅडम यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सातपुडा परिवार व स्पंदन फॉउंडेशन च्या सदस्यांनी यपरिश्रम घेतले...
