डॉ सतिश शिरेकार यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केल्या बद्दल जाहीर सत्कार...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
वंचित बहुजन आघाडी चे जळगाव जा.मतदारसंघातील नेते ओबीसिंचा, वंचितांचा बुलंद आवाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन सन्माननीय डॉ.सतीश शिरेकार साहेब शेगांव शहर मध्ये आले असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक शेगांव येथे कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात त्यांचं आणि फटाक्यांच्या आतिश बाजीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सावंगताई, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते अजयभाऊ सुरवाडे, जळगांव जामोद तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे, संतोष पवार ,रोशन तायडे , योगेश म्हसाळ,जेष्ठ नेते धरमकुमार बांगर, राजवर्धनभाऊ शेगोकार, शहर अध्यक्ष सलमानभाई, युवा अध्यक्ष संदेशकुमार शेगोकार,उपाध्यक्ष उदयभाऊ सुरवाडे,अनमोल शेगोकार,महासचिव किरण शेगोकार, कार्यकमाचे नियोजन करणारे अनिकेतभाऊ सुरवाडे व आकाशभाऊ बांगर त्याच प्रमाणे उपस्थित नंदू वाकोडे, योगेश शेगोकार, क्षितिजभाऊ निर्वाण, हिम्मत बांगर, राहुल मोरे, मुकेश बांगर,जयदेव पाटील, जयवर्धन शेगोकार,रवी वाघ, बाबू शेगोकार, मुकेश शेगोकार,ऍड. मोबीन शेख, इरफान कुरेशी,सोनू कुरेशी, रोहित सुरवाडे,इम्रान शेख,यासह शहर आघाडी, युवा आघाडी चे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
