चिखलदरा प्राँसपेक्ट पाँईट यैथिल घटना..विज पडुन पशुपालकासह तीन म्हशींचा मृत्यू...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा नगर पालिका क्षेत्रातील प्राँसपेक्ट पाँईट परिसरात नेहमीप्रमाणे पशुपालक जनावरे चारात असंताना अचानक विज कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एका पशुपालकासह तीन म्हशीचा घटस्थाळी मृत्यू झाला. चिखलदरा येथिल पाढरी वार्ड मधील रहिवासी गुलाबराव खडके (६५) असे मृत पशुपालकाचे नाव आहे. तो नेहमी प्रमाणे आपल्या जनावरांना चारत असताना अचानक पणे विज कोसळल्याने दोन म्हशी व एका वघारीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच तत्काळ गुलाबराव खडके यांना चिखलदरा येथिल शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र डाँक्टरानी मृत असल्याचे घोषित केले. घटनास्थळी पोलिस, महसूल व वनविभागातील कर्मचाऱ्यांनी दाखल होत पंचनामा केला.
