पिंपळगाव काळे हज्जन जैतूनबी बापूमिया पटेलची विद्यार्थिनी गायत्री गजानन डवंगेची राज्यस्तरीय सुवर्ण पदकासह राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी...


 
पिंपळगाव काळे हज्जन जैतूनबी बापूमिया पटेलची विद्यार्थिनी गायत्री गजानन डवंगेची राज्यस्तरीय सुवर्ण पदकासह राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी...

 मंगल काकडे/जळगाव जामोद...

 महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे मार्फत आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात हज्जन जैतूनबी बापूमिया पटेल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव काळे ची विद्यार्थिनी गायत्री गजानन डवंगे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे या विद्यार्थिने ४५ किलो खालील वजन गटात राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे.त्यामुळे डिसेंबर महिन्यात गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ती संबंधित वजन गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. गायत्रीच्या ह्या नेत्र दिपक यशाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे. "सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्य" चे संस्थापक अध्यक्ष ॲड.सलीम पटेल व सचिव विजय अंभोरे यांनी गायत्रीचे अभिनंदन करून तिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष कय्युम पटेल ,सहसचिव रब्बानी देशमुख , संचालक सिराजोद्दीन पटेल, प्राचार्य एम बी इंगळे , प्राचार्य मोहम्मद शोएब , आदी सर्वांनी गायत्रीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.गायत्री हिला स्पर्धेसाठी कोच अनिल अंबुसकर व क्रीडाशिक्षक जितेंद्र कचवे  यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या हया नेत्रदीपक यशाचं सर्वत्र कौतुक होत असून महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post Next Post