अकोला येथे अंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात बी एस पटेल महाविद्यालयाचा सहभाग...
मंगल काकडे/जळगाव जामोद...
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथील युवा महोत्सव संघाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल सहसचिव रब्बानी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला येथे दिनांक 27 ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान सुरू असलेल्या अंतर महाविद्यालय युवा महोत्सव स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांनी एकांकिका या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट एकांकिकेचे प्रदर्शन केले.एकांकिकेचे नाव "आमची रेल्वे, स्वच्छ रेल्वे" असे होते. भारतीय नागरिक रेल्वे व रेल्वे स्टेशनला कशाप्रकारे घाण करतात व ते आपण कसे स्वच्छ ठेवू शकतो, याचे उत्कृष्ट प्रदर्शन या नाटिकेमध्ये दाखविले. नाटिकेमध्ये संभाषण व नाटीकेवर आधारित गाण्यांचा समावेश होता. वरील नाटकाचे लेखन व दिग्दर्शन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ बाबाराव सांगळे यांनी केले. संघ व्यवस्थापक प्रा प्राजक्ता बाठे ह्या होत्या. या युवा महोत्सवाच्या संघाला शुभेच्छा संस्थेचे उपाअध्यक्ष कय्यूम पटेल संचालक सिराजोद्दीन पटेल कार्यकारी प्राचार्य डॉ शेख फराह डॉ नूर मोहम्मद डॉ चेतन पलन आयक्यूएसी समन्वयक डॉ ए एस काजी प्रा महेश नेतनास्कर डॉ निखिल अग्रवाल प्रा मोहम्मद शोएब प्रा आनंद जाधव प्रा शकील खान प्रा मनोहर जांभळे प्रा नितिन आसोले डॉ दिपाली शिरसाट गजानन इंगळे, गजानन भोपळे शेख मोसाब विशाल दाने परेश अवचार अमोल देवकर सागर खांदे व सर्व सीएचबी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिल्या.या संघामध्ये सहभागी विद्यार्थी निकिता बुंदे ,वैशाली हरमकार, गायत्री पांडव, गायत्री हरमकार, रूपली वडोदे ,वैशाली घोपे, सागर पडोळ, ओम मानकर, पवन गायकवाड ,ऋषिकेश बोदडे, मंगेश पांडे हे होते.
