शिवसेना नेते डॉ.मधुसूदन सावळे यांनी घेतली मा.केंद्रीयमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट..!
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...
आज दि.३०/०९/२०२४ वार सोमवार रोजी देशाचे मा.केंद्रीयमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री.शरदचंद्र पवार साहेब यांची पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगांवचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या समवेत शिवसेना नेते डॉ.मधुसूदन सावळे यांनी सदिच्छा भेट घेतली..!आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पवार साहेबांशी चर्चा केली.त्यांना आतापर्यंत केलेल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा त्यांच्याकडे सोपवला. आणि भावी राजकीय जीवनासाठी आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतले..!आदरणीय पवार साहेबांना भेटायची त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळणं हे मी माझं भाग्य समजतो..ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी "सुवर्ण" संधीच आहे..!
.jpg)