तीन दिवसात दिले दोन अजगरांना जीवनदान...सर्पमित्र प्रतिभा ठाकरे ,दीपक लोड यांचा प्रयत्नातून वाचले जीव..वन्यजीव संस्थेचा उपक्रम..


तीन दिवसात दिले दोन अजगरांना जीवनदान...सर्पमित्र प्रतिभा ठाकरे ,दीपक लोड यांचा प्रयत्नातून वाचले जीव..वन्यजीव संस्थेचा उपक्रम..

अकोला जिल्हा प्रतिनिधी...

पारस इथून जवळच असलेल्या बाळापूर तालुक्यातील राजपूत नगर इथे बादल ठाकूर यांना मध्यरात्री त्यांचा घराजवळ मोठा साप आढळून येताच त्यांनी वन्यजीव संस्था चा सदस्यां तथा सर्पमैत्रिन प्रतिभाताई ठाकरे यांच्याशी संपर्क साधला सर्पमैत्र ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या तिथे पोहचल्या सापाची पहाणी केली असता तो अजगर जातीचा बिनविषारी साप आहे हे त्याचा लक्षात आले त्यांनी त्या सापाला सुरक्षित रित्या पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले तसेच आज दुपारी ग्राम कसुरा येथे शेतात काम करीत असताना दत्ता रामदास ताथोड यांना अवाढव्य साप असल्याचे निदर्शनास आले त्यांनी मणारखेड येथील सर्पमित्र दीपक लोड यांना संपर्क साधला यावेळी दीपक लोक,विजय लोड ,प्रतिभा ठाकरे यांनी या सापाला सुरक्षित रित्या पकडून निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.दोन्ही गावातून पकडण्यात आले साप हे अजगर जातीचे असून त्यांनी सरासरी लांबी आठ ते नवं फुटापर्यंत होती.अजगर हा साप दिसायला अवाढव्य असला तरी तो पूर्णपणे बिनविषारी साप आहे याचा पासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही विशेष म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असल्या कारणाने वन्यजीव कायद्याच्या 'अ' श्रेणीत मोडतो या सापाला मारल्यास शिक्षा पण होऊ शकते.अजगर ही प्रजाती अवाढव्य व सुस्त प्रकारची असून शक्यतो हा साप रात्रीच्या वेळेस आपले भक्ष्य पकडतो क्वचितच दिवसा हा भक्ष्य पकडतो.हा साप थंड जागा पसंत करतो या सापाची अधिकतम लांबी ही पंधरा फुटापर्यंत होऊ शकते व हा उंदरा पासून तर वाघापर्यंत चा शिकार हा करू शकतो हा साप अंडी देतो मादी अंड्यातून पिल्लं निघत पर्यंत अंड्याचे रक्षण करते तसेच अंड्यातून निघालेल्या पिल्लांची लांबी ही दोन फुटापर्यंत राहू शकते . अशी महत्वपूर्ण माहिती यावेळी सर्पमैत्रिन प्रतिभाताई ठाकरे यांनी दिली.सर्पमित्र दीपक लोड,प्रतिभा ठाकरे सहकारी विजय लोड तसेच नितीन ठाकरे यांचा तत्परतेने सापाचे जीव वाचले त्यांचा धेर्याचे, तत्परतेचे उपस्थित ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले

Previous Post Next Post