वंचितकडून डॉ. प्रविण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल... अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी...


 
वंचितकडून डॉ. प्रविण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल... अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल दिनांक २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हजारोंच्या संख्येने वंचितांनी उपस्थित होत उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. जळगाव जामोद मतदारसंघात धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी लढत होत असून यामध्ये जनशक्तीचा विजय निश्चित आहे, म्हणजेच जनतेचे उमेदवार डॉ. प्रविण पाटील हेच निवडून येतील असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते अशोक सोनोने यांनी केले. ते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रविण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेप्रसंगी हजारोच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते.सुरूवातील सकाळी ११ वाजता सुमारास जळगाव जामोद येथील धुत मैदानावर शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील कार्यकर्ते एकत्रित झाले व नंतर दुपारी १ वाजता सुमारास धुत मैदानापासून एसडीओ कार्यालयापर्यंत रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. 

यावेळी रॅलीत हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रविण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रविण ण पाटील म्हणाले की, मी जनतेची सेवा त करण्यासाठी निवडणूक लढवित आहे आणि डी निवडून आल्यानंतर गद्दारी करणार नाही, याची शाश्वती देतो.याप्रसंगी अशोक सानोने यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने, माजी जि.प. सदस्य विठ्ठल पाटील, माजी शहराध्यक्ष राजू शेगोकार, अॅड. अनिल इखारे, श्रीकृष्ण गवई, प्रा.अनिल वाकोडे, उपसरपंच पंडीत परघरमोर, जळगाव जा. तालुकाध्यक्ष संतोष गवई, संग्रामपूर करा तालुकाध्यक्ष भेलके, शेगाव तालुकाध्यक्ष दादाराव अंभोरे, श्रीकृष्ण गवई, रमेश नाईक, साहेबराव भगत,अताऊल्लाखॉ, मो. सलीम, संदेश शेगोकार, सुखदेवराव सानोने, ज्ञानेश्वर तायडे निळकंठ पाटील यांच्यासह हजारो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post