आमदार डॉ.संजय कुटे यांनी आपला मतदारसंघ उत्कृष्ठ बनवला आता महाराष्ट्र सुंदर बनवण्यासाठी त्यांना विजयी करा.-केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव...
राजेश बाठे/आर सी २४ न्युज...
केंदीय मंत्री यांनी पुढे आपले मनोगत व्यक्त करतांना यादव म्हणाले की संजुभाऊं नी कोविड काळात लोकांची सेवा केली तसेच पिण्याचे पाणी शिक्षण नियोजित हॉस्पीटल आणि प्रक्रिया उद्योग इत्यादींचा लेखा जोखा सांगितला आता उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी संजयभाऊ प्रचंड मतांनी विजयी करा व राहिलेल्या योजना पूर्ण करण्याची संधी द्यावी असे आव्हान करून आपले मनोगत संपविले महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. कुटे यांनी आपल्या मनोगतातून आज पर्यंत केलेल्या कामांचा लेखा जोखा सांगून भविष्य विषयी मत मांडताना त्यांची भावना प्रधान म्हणजे माझी निवडणूक मी लढवत नसून मंचकावरील मातृ शक्ती निवडणूक लढवणार आहे लाडकी बहिण योजनेसाठी अर्थ संकल्पात ४० हजार कोटी रुपयांची मार्च पर्यंत तरतूद केली आहे त्यामुळे ती योजना कोणीही बंद करू शकत नाही व होणार पण नाही महिलांना ५०% मोफत शिक्षण एसटी मध्ये सवलत सोनाळा येथे तरुणांच्या हाताला काम साठी संत्राउद्योग व या तीन वर्षात आपल्या मतदार संघात साखर कारखाना आणल्या शिवाय राहणार नाही असे वचन देतो हि माझी शेवटची लढाई आहे आपण मला चार वेळा आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिली असेच आशीर्वाद या वेळीही द्यावे हि विनंती करतो असे म्हणून आपले भाषण संपविले त्या वेळी केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी हि मला जसे आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद संजय भाऊनां द्यावे अशी विनंती केली सभेचे प्रास्ताविक रंगराव देशमुख, जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख यांनी आभार मानले.त्या नंतर रँलीने उपस्थित नागरिक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गाने वाजत गाजत रँली निघाली त्यातही गर्दी प्रचंड होती तर महिलांची संख्या खूपच असल्याने रँलीचे पहिले टोक दुर्गा चौक ते शेवटचा व्यक्ती माळीखेळ पर्यंत होता आजच्या रँलीचे स्वरूप प्रचंड होते. उपविभागीय कार्यालय आमदार डॉ संजय कुटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला यावेळी जळगाव जामोद मतदारसंघातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

