वंचितचे दीपक बोडखे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन...केला उमेदवारी अर्ज दाखल..
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
वंचित बहुजन आघाडीचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपक बोडखे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालयात मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी दाखल केला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत.प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.अकोला जिल्ह्यात अकोट हा महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो. वंचित बहुजन आघाडीचे दीफक बोडखे यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर व प्रा. अंजली आंबेडकर यांचे दीपक बोडखे अत्यंत विश्वासू मानले जातात.मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत दाखल करण्यात आला.
