२२कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे पंतप्रधानाच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन.जळगांव मतदारसंघात १४३ कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न...
राजेश बाठे/संपादक आर सी२४ न्युज...
जळगांव जामोद शहराला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत २ योजनेअंतर्गत असलेल्या २२कोटी रुपयांच्या योजनेचे देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.स्थानिक नगरपालिका सांस्कृतिक सभागृहात झालेल्या सोहळ्यात जळगांव जामोद मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे,तहसीलदार पाटील,माजी नगराध्यक्ष रामदास बंबटकार,मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके,डॉ.नंदू तायडे,भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,कैलास डोबे,राजेश गोटेचा,मांगीलाल भन्साली,बाळू पाटील,अनिल जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.मान्यवरांच्या उपस्थितीत आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते योजनेच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.यावेळी बोलताना आ.डॉ.संजय कुटे यांनी अमृत २ योजनेबाबत सविस्तर माहिती देत येणाऱ्या काळात जळगांव जामोद मतदारसंघ हा स्वच्छ पाणीपुरवठा असणारा मतदारसंघ होणार असल्याचे सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन.२०१४ मध्ये सुरू केलेल्या स्वछता अभियानाबाबत बोलतांना हे अभियान लोकचळवळ झाल्याचे सांगितले.प्रस्ताविकात मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी शहरातील अमृत 2 योजनेबाबत विस्तृत माहिती दिली.कार्यक्रमाचे संचलन मोकसरे यांनी केले.कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
१४३कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न...
जळगांव जामोद मतदारसंघातील वडशिंगी,भेंडवळ,सोनाळा,टूनकी पंचायत समिती सर्कल मधील सुमारे १४३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण,भूमिपूजन करण्यात आले.
.jpg)