चला फार्म भरू या,महाविजयाचा निश्चय करू या...आ डॉ.संजय कुटे आज उमेदवारी अर्ज भरणार..जळगाव जा येथे सोमवारी रॅली व जाहिर सभा...
जळगाव जा प्रतिनिधी:-
भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे हे सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 उपविभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याअनुषंगाने जळगाव जा येथील राठी जिनिंग चे मैदानावर जाहिर सभा होवून शहरातून भव्य रॅली निघणार आहे.ही रॅली राठी जिनिंग मधून निघून मनिषा चौक, मानाची चौक,चौभारा चौक,दुर्गा चौकातून उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत पोहोचणार आहे.याप्रसंगी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रभारी भुपेंद्रसिग यादव,केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सोबतच भारतीय जनता पक्ष,शिवसेना,राष्ट्रवादी काॅग्रेस,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया,पिरिपा व महायुतीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.तरी जळगाव जा विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीचे वतीने करण्यात आले आहे.
