राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे एक दिवसीय शिबिर संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
दिनांक 23/10/2024 वार बुधवार ला सेठ तुळशिरामजी ढोकणे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आसलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा च्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे एक दिवसीय शिबिर सातपुडा परिसरातील त्रिशूल खुटी,भिंगारा घाट येथे पार पडले.सर्वप्रथम त्रिशूल खूटी,भिंगारा घाट येथे यावर्षी भरपूर पावसाळा झाला असल्यामुळे हिरवळीने नटलेल्या सातपुडा परिसरचा आनंद घेत फेरफटका मारला.. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या कु. ज्योती वानेरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सातपुडा परिसरात उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पती,परिसरातील वन्यप्राणी तसेच या परिसरात राहत असलेल्या आदिवासी समुदायाबद्दल व पर्यावरण समतोल याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.नदीकाठच्या निसर्गरम्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंद घेतला शेवटी जवळच असलेल्या गोराळा धरण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेट दिली.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी धरण परिसराची स्वच्छता केली.एक दिवसीय शिबिर पार पडण्यासाठी कार्यक्रमाधिकारी अतुल उमाळे सर व कु. पूनम करांगळे मॅडम तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
