श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मतदार जागृती रॅली...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 24ऑक्टोबर 2024 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मतदार जागृती रॅली चे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाच्या प्रांगणातून रॅली ची सुरुवात प्राचार्य डॉ.गिरीश मायी यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून झाली, जळगांव जामोद नगरातून मार्गक्रमण करीत असताना विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो.अशा विविध घोषणा देत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या घोषणांमधून प्रत्येक मतदाराने मतदान केलेच पाहिजे ही भावना प्रदर्शित होत होती,घोषणांच्या निनादात विद्यार्थी महाविद्यालयात परत पोहोचले. सोबत पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखेडे ,अधिक्षक संजय गाडेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.राजीव देवकर,प्रा.ऋषीकेश कांडलकर, प्रा.वसंत चव्हाण, प्रा.व्ही.बी.झोपे, , प्रा.रामेश्वर सायखेडे , प्रा.निलिमा भोपळे यांचा सहभाग होता व प्रा.गणेश जोशी, प्रा.विनोद बावस्कार, समाधान निलजे यांचे सहकार्य लाभले.तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थीनी उत्साहात मतदार रॅली मधे सहभागी झाले,महाविद्यालयात या रॅली ची सांगता करण्यात आली.
