मोठी वर्दळ असणाऱ्या फरशी पुलाचे पालटणार रूप _नवीन पूल व सौंदर्यीकरणासाठी ३ कोटी निधी मंजूर_ आ. फुंडकर यांच्या अभिनव संकल्पनेतून शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल...


 
मोठी  वर्दळ असणाऱ्या  फरशी पुलाचे पालटणार रूप _नवीन पूल व सौंदर्यीकरणासाठी ३ कोटी निधी मंजूर_ आ. फुंडकर यांच्या अभिनव संकल्पनेतून शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल...

सुरज देशमुख/ बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

खामगाव  मतदार संघाचे कार्यशील आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर यांच्या अभिनव संकल्पनेतून खामगाव शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान  जुन्या व नव्या शहराला जोडणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या  फरशी पुलाच्या निर्मिती व सौंदर्यीकरणासाठी ३ कोटी रूपयांचा निधी आ.फुंडकरांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून लवकरच फरशी पुलाचे रुप पालटणार आहे.विकास ही न संपणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कोणतेही विकास काम करताना पुढील काळातील व्हिजन ठेवून ते करणे गरजेचे असते. आज शहरे झपाट्याने वाढत आहेत. त्यादृष्टीने विकासात्मक आराखडा तयार करून आमदार ॲड.आकाशदादा फुंडकर काम करीत आहेत. त्यामुळेच खामगाव शहरासह मतदार संघाची शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही दिवसापुर्वीच शेवटच्या क्षणी सुध्दा आ.फुंडकरांच्या प्रयत्नाने खामगाव शहरातील विकास कामांसाठी २० कोटी रूपयांच्या भरीव निधीला मंजुरात मिळाली आहे. यातून शहरातील अत्यंत वर्दळीच्या तसेच जुन्या आणि नव्या शहराला जोडणाऱ्या फरशी  पुलाचे नवीन  निर्माण व सौंदर्यीकरण ३ कोटी रूपये खुर्चन केले जाणार आहे. या कामाला प्रशासकीय मंजुरात सुध्दा मिळाली असून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वप्रथम बोर्डी नदीवर असलेला जुना पुल पाडून दोन्ही बाजूला असलेल्या डीपी इतरत्र हलविण्यात येणार आहेत. तसेच दोन्ही कडील पुलांना एकरूप करून चौरस पुलाचे निर्माण करून  सौंदर्यीकरण, नागरिकांना बसण्यासाठी तीन ते चार ठिकाणी मार्बलचे ओट्यांची उभारणी केली जाणार आहे. तसेच या भागात  पोळा भरत असल्यामुळे या ठिकाणी बैलजोडीची आकर्षक अशी प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या सर्व युअभरणीतून साकारल्या जाणाऱ्या या पुलावरील विहंगम दृष्य सर्वांसाठी आकर्षण ठरणार आहे. हा पूल आजपर्यंतचा शहरातील सर्वात रूंद पुल  राहणार असून फरशी चौकाचे रूपडे पालटणार आहे. शहरातील जवळपास अर्ध्या गावातील नागरिकांची वर्दळ दररोज या पूलावरून असते. दरम्यान हे काम पुर्णत्वास गेल्यानंतर नागरिकांना रहदारीसाठी तसेच सण - उत्सव काळात सुध्दा मोठी सुविधा होणार आहे. आ.आकाश फुंडकर यांनी गेल्या ५ वर्षात हजारो कोटी रूपयांचा निधी खेचून आणत  विविध विकास कामे केली तर शेवटच्या क्षणी सुध्दा त्यांनी मंजूर करून आणलेल्या निधीमुळे विकासाची ही गंगोत्री वाहतच असल्याचे  दिसून येत आहे.

५ कोटी  खर्चून आणखी तीन पुलांचे होणार निर्माण 

फरशी पुलाबरोबरच पाच कोटी खर्चून शहरातील मुख्य रस्त्यांवरील आणखी तीन पुलांची निर्मिती देखील होणार आहे. यामध्ये नांदुरा रोडकडून महाकाल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल, शहर पोलिस स्टेशन जवळील पुल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान पासून ते ग्रिन पार्क पर्यंतच्या रस्त्यावरील पुलाचा  समावेश आहे. या कामांची निविदा प्रक्रिया सुध्दा पुर्ण झाली आहे. तर यापुर्वीच उपरोक्त तिन्ही रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झालेले असून यापैकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान ते भारत कटपीस पर्यंतच्या रस्ता कामाला सुरूवात देखील झाली आहे. त्यामुळे सदर रस्ते व पुलाचे निर्माण झाल्यानंतर शहरात नागरिकांसाठी प्रशस्त रस्ते उपलब्ध होणार आहेत.

----------------------------------------

Previous Post Next Post