मनसे उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या नामांकन रॅलीस जोरदार प्रतिसाद अकोट विधानसभा निवडणुकीत मनसेचे वादळ...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट विधानसभा मतदार संघातील मनसेचे अधिकृत उमेदवार सुनील डोबाळे यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दाखल करण्यासाठी मनसेचे अकोला जिल्हा निरीक्षक कर्ण बाळाजी दुनबळे अकोला जिल्हा अध्यक्ष राजेशजी काळे पंकज साबळे महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसाताई अंबेरे मनसे विभाग राज्य सरचिटणीस ऍड नंदकीशोर शेळके संपर्कप्रमुख निसार शेख अकोला जिल्हा उपाध्यक्ष श्रीरंग दादा तट्टे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले मनसेचे अकोला महानगर अध्यक्ष सौरभ भगत मनसे अकोट तालुका अध्यक्ष कैलास धुळे गणेश जिल्हाध्यक्ष शशांक कासवे आरंभचे सचिव विशाल राठोड व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलेश राठी आरंभ सहसचिव तुषार अढाऊ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह अकोट व तेल्हारा तालुक्यातील पदाधिकारी माजी अधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांसह महिला पुरुष नागरिक हे मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी झाले होते फॉर्म भरल्यानंतर मनसे उमेदवार कॅप्टन सुनील डोबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना जनतेच्या मनातील अपेक्षित असलेल्या विकासावर जोर देऊन काम करणार असे सांगीतले तर मनसे प्रमुख माननीय श्री राज साहेब ठाकरे यांचे आभार मानले अकोट मतदार संघातील नागरिकांची सर्वात मोठी मागणी जी स्थानिक उमेदवार असावा ही होती त्याला मान देत जनतेच्या पसंतीनुसार स्थानिक उमेदवार देऊन जनतेच्या मागणीला साथ दिली त्याबद्दल राजसाहेब व मनसेचे कॅप्टन डोबाळे यांचे आभार मानले रॕलीची सांगता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेल्या वेळेच्या आतच पूर्ण करून संपूर्ण जोश भरलेले कार्यकर्ते व मनसे सैनिक यावेळे भारावुन गेले होते कारण त्यांना पूर्ण रॅलीमध्ये एवढा मोठा प्रतिसाद पाहता त्यांच्या विजय निश्चितच होईल व त्यांचा आमदार विदर्भातील एक माजी सैनिक अधिकारी हा विधानसभेत बसेल याची खात्री वाटत होती.
