घोड्यावर बसवून आ डॉ.संजय कुटे यांची मिरवणूक काढत केले आवारमध्ये अविस्मरणीय स्वागत...पाचव्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पाठविण्याचा गावकर्यांचा निर्धार..


 
घोड्यावर बसवून आ डॉ.संजय कुटे यांची मिरवणूक काढत केले आवारमध्ये अविस्मरणीय स्वागत...पाचव्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पाठविण्याचा गावकर्यांचा निर्धार..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

संग्रामपूर तालुक्यातील आवार येथील विविध विकास कामांचा लोकार्पण तसेच प्रस्तावित कामांचा भुमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.गावकऱ्यांनी नेहमीच्याच आगळ्यावेगळ्या शैलीत आ डॉ.संजयभाऊ कुटे यांचे घोड्यावर बसवून मिरवणूक काढत स्वागत केले.मौजे आवार म्हणजे आमदार डॉ.संजय कुटे यांचेवर निस्वार्थीपणे आणि सतत विकासकामांचा आग्रह करणारे गाव, गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेम व सहकार्यामुळे विकास करण्याचे बळ मिळत असते, त्याचाच प्रत्यय आज विविध विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने संग्रामपूर तालुक्यातील आवार येथे आला.आ. डाॅ संजय कुटे हे आवार येथे विकास कामाच्या भूमिपूजनासाठी गेले असता चक्क ग्रामस्थांनी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात स्वागत केले.घोड्यावरून मिरवणूक काढल्यानंतर  आ डाॅ संजय कुटे यांनी लोकांचं प्रेम काय असतं याचा प्रत्यय मी जळगाव जा विधानसभा मतदार संघातील जनतेकडून घेत आहे. व्यक्तीगत माणसांच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण हा एकदाच असतो परंतू घोड्यावर बसवून ढोलताशाच्या तालात फटाक्यांच्या आतषबाजीत आमदार  'आमदार' म्हणून अविस्मरणीय मिरवणूक आवार येथील ग्रामस्थांनी अविस्मरणीय मिरवणूक काढली असे उद्गार भारावून गेलेल्या आ डाॅ संजय कुटे  यांनी काढले.यावेळी बोलताना आ डाॅ संजय कुटे म्हणाले की,मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित होते. यावर  तोडगा काढत सातत्यपूर्ण प्रयत्नातून आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी मिळाली. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भुमिका जनमानसात मिसळंल की आपोआप जोड लागते. जळगाव जा मतदार संघातील प्रत्येक समाज घटकाचा विकास साधण्याचे दृष्टीकोनातून काम केल्याचा मनोमन आनंद व समाधान वाटत आहे,विकास कामामुळे जनतेला झालेल्या आनंदातच माझा आनंद असल्याचे प्रतिपादन आ डाॅ संजय कुटे यांनी यावेळी केले.

Previous Post Next Post