जामोद सर्कलमधील उसरा,चालठाणा,सुनगावमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा भरभरून प्रतिसाद...


 
जामोद सर्कलमधील उसरा,चालठाणा,सुनगावमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा भरभरून प्रतिसाद...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

महाविकास आघाडीचे उमेदवार स्वातीताई वाकेकर यांना मतदारसंघात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, गावागावातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे....जामोद सर्कलमधील उसरा,चालठाणा,,सुनगांव या गावांमध्ये  त्यांचे ढोल ताशाच्या गजरात भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले....डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचार मुरवणुक दरम्यान लोकांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता....,या मिरवणुकी दरम्यान संपुर्ण गाव हे रांगोळी व फुलांनी व फटाक्यांची आतिषबाजीने गावाचे रस्ते हे उजळुन निघाले.यावेळी गावांमध्ये प्रत्येक घरासमोर महीलांनी ताईचे औशन केले व प्रचार रॅली मध्ये आपला स्वयंमस्फृतीने सहभाग नोंदविला.गावातील प्रत्येक रस्ता व घरासमोर महीलांनी रांगोळी माध्यमातून परिवर्तन होणार... स्वातीताई येणार अशा संदेश रांगोळीच्या माध्यमातून संदेश दिला जात होता...यावेळी मतदारांची बोलताना, डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी,मतदार संघाचे आमदार यांनी केलेल्या भ्रटाचाराचा लेखाजोखा मांडला आणि सुनगाव व जामोद या गावात युवकांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले...याप्रसंगी सुनगाव येथे प्रचार जाहीर सभा घेण्यात आली,या सभेमध्ये महायुतीवर मान्यवरांनी भाषनातुन टिका केली,यामध्ये माजी सरपंच पुंडलिक पाटील, रामेश्वर केदार, भिमराव पाटील, समाधान दामधर, रमेश ताडे, वसंत धुर्डे, तुकाराम काळपांडे,दत्ताभाऊ पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले....याप्रसंगी प्रचार रॅली मध्ये महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील महिला व नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Previous Post Next Post