पिंपळगाव काळे सर्कल मधील गावो गावी प्रचाराचा झंझावात..माझा देव आला म्हणत खांडवीच्या लीलाबाईने आ डाॅ संजय कुटे यांना कवटाळले...


 
पिंपळगाव काळे सर्कल मधील  गावो गावी प्रचाराचा झंझावात..माझा देव आला म्हणत खांडवीच्या लीलाबाईने आ डाॅ संजय कुटे यांना कवटाळले...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

जळगाव जामोद  तालुक्यातील खांडवी येथील लिलाबाई सारोकर यांचे घरी आमदार डाॅ संजय कुटे आले,तेव्हा  माझा देव आला असे म्हणत वृध्द महिलेने गहिवरून त्यांना कवटाळले.यावेळी आमदार डॉ.संजय कुटे यांनाही अश्रु अनावर झाले.

जळगाव जा तालुक्यातील खांडवी येथील लिलाबाई सारोकार..

ह्या गेल्या दोन वर्षा पूर्वी आजारग्रस्त झाल्या होत्या. आमदार संजय  कुटे यांनी लिलाबाई सारोकार यांना ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली.माझ्या साहेबांकडे मी  सध्या जग पाहू शकत असल्याचे भावनिक होवून लिलाबाई  म्हणाल्या.मतदार संघातील अनेक कॅन्सर ग्रस्त,किडनीग्रस्त तसेच इतरही रुग्णांना वैद्यकीय मदत आमदार कुटे यांनी केली आहे.पिंपळगाव कामे सर्कल मधील खेडोपाड्यात 5 नोव्हेंबर रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे प्रचार दौरा करत ग्रामस्थांच्या घरोघरी जावून आशिर्वाद घेतले. प्रचारा दरम्यान विविध योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक लाभार्थीनी स्वतःहून आमदार कुटे यांची भेटी घेऊन त्यांचे आभार मानले.काल मंगळवारी पिंपळगाव कामे सर्कल मधील माहुली,मानेगाव,टाकळी पा.गोळेगाव,हूरसाळ,टाकळी खासा,हिंगणा नवे,गोळेगाव नवे,हिंगणा जुने,गोळेगाव जुने,दादुलगाव नवे,खांडवी,दादुलगाव जुने,झाडेगांव,गौलखेड येथे जावून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जन संवाद दौऱ्याला सर्व ठिकाणी मिळणारा ज्येष्ठांचा आशीर्वाद, युवकांची साथ आणि सर्वांचा मिळणारा प्रतिसाद कार्याची नवी उमेद जागविणारा आहे. जन संवाद दौर्यास सर्व ठिकाणी नागरिक देत असलेल्या उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल आ डॉ.संजय कुटे यांनी धन्यवाद दिलेत.

Previous Post Next Post