वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रवीण पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ..जळगाव मतदार संघातील इलोरा येथे फोडला प्रचाराचा नारळ...


 
वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रवीण पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ..जळगाव  मतदार संघातील इलोरा येथे फोडला प्रचाराचा नारळ...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

20 नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून.... त्या अनुषंगाने जळगाव जामोद मतदारसंघातील निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांनी आपापल्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात केली आहे.... जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांनीही मतदारसंघातील श्री सखाराम महाराज संस्थान इलोरा येथे नारळ फोडून पाच नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता आपल्या निवडणूक प्रचाराचा श्री गणेशा केला आहे.तसेच श्री सुपोजी महाराज संस्थान पळशी सुपो, महासिद्ध महाराज संस्थान धानोरा, पीर पोलाद दर्गा जामोद, आवजीसिद्ध महाराज सूनगाव, श्री सोनाजी महाराज संस्थान सोनाळा, आई जगदंबा संस्थान वानखेड अशा विविध ठिकाणी भेटी देत मतदारसंघातील आराध्य दैवतांचा शुभ आशीर्वाद घेऊन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला वंचित बहुजन आघाडी कडून धडाकेबाज सुरुवात करण्यात आली आहे.... यानंतर दुपारच्या सत्रामध्ये पातूर्डा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिरीवर बाबासाहेबांना अभिवादन करून  संत नगरी शेगाव येथे सायंकाळी सात वाजता या निवडणूक प्रचार कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी डॉ. प्रवीण पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जामोद मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने   उपस्थित होते.

Previous Post Next Post