निसर्गाच्या सानिध्यात दि.न्यू.ईरा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एक दिवशीय पर्यावरण सहल...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
राष्ट्रीय सेवा योजना युनिट तर्फे एक दिवशीय पर्यावरणीय सहल सातपुड्याच्या सानिध्यात दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दि.न्यू.ईरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आली. एक दिवशीय पर्यावरणीय सहल ही सातपुडा परिसरातील निमखेडी व आमपाणी या परिसरात पार पडली. यावर्षी जळगाव जामोद तालुक्यामध्ये विशेषता सातपुडा पर्वतामध्ये चांगला पाऊस झाला त्यामुळे आजपर्यंत नद्या ह्या मंद गतीने वाहत असून त्या परिसरातील परिसर हा हिरवराईंने नटला आहे. या परिसराचा आनंद घेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सुद्धा सातपुड्यातील या परिसराचा फेरफटका मारला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना सातपुडा परिसरात उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पती,परिसरातील वन्यप्राणी तसेच पर्यावरणाची स्वच्छता व सेवाभाव कसा ठेवावा याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.या परिसरात राहत असलेल्या आदिवासी समुदायाबद्दल व पर्यावरण समतोल याविषयी विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.नदीकाठच्या निसर्गरम्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी सह स्नेहभोजनाचा आनंद घेतला.शेवटी जवळच असलेल्या निमखेडी या गावाला विद्यार्थ्यांनी भेट दिली.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिसराची स्वच्छता केली.एक दिवसीय पर्यावरणीय सहल पार पडण्यासाठी जिल्हा समन्वयक प्राध्यापक नीलकंठ राठोड पर्यवेक्षक एस.एफ.पाटील सर कार्यक्रमाधिकारी अनिल डाबरे सर,ढोकणे मॅडम,सीसट मॅडम शेडमाके मॅडम,गिऱ्हे सर ,वसीम सर तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.