महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ.सौ. स्वातीताई वाकेकर यांनी महासिद्ध महाराजांचे दर्शन घेऊन फोडले प्रचाराचे नारळ...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्या अनुषंगाने आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांनी धानोरा येथील महासिद्ध महाराज यांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व नेतेमंडळी प्रचारासाठी पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, रिपाई गवई गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच धानोरा येथील नागरी मोठ्या संख्येने प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित होते.
