आमदार आकाश फुंडकर यांच्या शहर प्रचार दौऱ्याला भव्य सुरुवात!प. पू. आगाशे काका यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
5 नोव्हेंबर रोजी खामगाव मतदार संघामध्ये आमदार आकाश फुंडकर यांच्या खामगाव शहर विभातील प्रचाराचा नारळ प.पू. आगाशे काका यांचे समाधीस्थळ बरसाना येथून करण्यात आली.आमदार आकाश फुंडकर यांनी खामगाव मतदारसंघात केलेल्या सर्वांगीण विकासकामांमुळे त्यांच्या प्रचाराला सामान्य जनता भरभरून प्रतिसाद देत आहे. रस्ते, जलसिंचन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारामुळे मतदारसंघातील नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.खामगाव शहरात प्रचार दौऱ्याला सुरुवात करताच प्रभाग क्र. १ पासून प्रत्येक भागात फुंडकर यांना नागरिकांचा भरभरुन पाठिंबा मिळत आहे. लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे जुने सहकारी यांच्या शुभहस्ते नारळ फोडून महायुतीचे अधिकृत भाजपा उमेदवार आकाश फुंडकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.आकाश फुंडकर यांच्या नेतृत्त्वाखाली झालेले प्रकल्प आणि सुविधा शहर व ग्रामीण भागात पोहोचवल्या गेल्याने प्रत्येक स्तरातील नागरिकांनी त्यांना समर्थन दिले आहे. यामुळे येत्या निवडणुकीत खामगाव मतदारसंघात जनतेचा आशीर्वाद आकाश फुंडकर यांना मिळेल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
