गौलखेडा बाजार या गावात शबरी माताचे रथाचे पुजन...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
भिल समाजातील असलेली शबरी माता यांचा रथ महाराष्ट्रात असलेले आदिवासी भिल समाज बांधवाच्या प्रत्येक गावाच्या ठिकाणाच्या जागी हे रथ फिरत आहे. त्याच प्रकारे चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार, बोपापुर, भिलखेडा, बोराळा, गरजधरी या गावाच्या ठिकाणी आज दि ५/११/२०२४ ला सायंकाळी ठिक ५वाजता गौलखेडा बाजार येथे शबरी मातेचा रथ आला असता येथिल भिल समाजातील गावातील महिला मंडळी व पुरुष मंडळी यांनी शबरी माता रथाचे पुजन मोठ्या थाटात केले असल्याचे चित्र दिसून आले आहे. या रथाचे पुजा करते वेळी भिल समाजाचे प्रतिष्ठ नागरीक संरपच अल्केश महल्ले, पोलिस पाटील रमेश महल्ले, भिल समाजाचे कार्यरते गोपाल भास्कर, मधुकर सुरत्ने, संजय भास्कर, गया बाई भास्कर, सिंधु ताई भास्कर, योगेंद्र सुरत्ने, रामेश्वर भास्कर व गावातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. त्याच प्रमाणे शबरी मातेचे रथ सोबत गजानन भाऊ सोलकर, अजाबराव भास्कर (पोपटखेड) कमल भास्कर, देवानंद मोरे, अंबादास भास्कर, राजु भास्कर, अंबादास बारे, श्रीराम भारसाकळे, मनोहर महाराज बारे व गोपाल सुरत्ने हे होते
