बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री शेळके यांना मिळतो प्रत्येक गावात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनील शेळके यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी बोराखेडी, अंत्री, पुन्हई, सारोळा पीर, सारोळा मारोती ता. मोताळा गावात प्रचारार्थ भेट दिली. त्यांनी गावातील नागरिकांसोबत हितगुज साधले. गावकऱ्यांनी उस्फुर्त पाठींबा दिला. या पदयात्रेच्या निमित्ताने आपण देत असलेला प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते !