आकांक्षित विकास तालुक्यात चिखलदरा राज्यात द्वितीय..केंद्र शासनाच्या 2024-25 या वर्षातील पाहिल्या'डेल्टारैंकिंग'मध्ये पटकाविले....
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
विकासाच्या बाबतीत अतिमागास तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या नीती आयोगाने संपूर्ण भारतात ५०० आकांक्षित तालुके घोषित केले आहे. नीती आयोगाची मुख्य उद्दिष्ट शाश्वत विकास असून मागास तालुक्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आहे. विशेष निर्देशांक आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी, संलग्न सेवा, सामाजिक विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या प्रमुख पाच थीमवर नीती आयोग कार्य करत आहे. यात महाराष्ट्रातील २७ तालुक्यांचा समावेश असून, त्यात अमरावती जिल्ह्यातील मेळघाट म्हणुन ओळख असणाऱ्या चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांचा सामावेश करण्यात आला आहे. वर्ष 2024-25 वर्षातील प्रथम 'डेल्टा रॅकिंग' मध्ये चिखलदरा तालुका विकासाच्या बाबतीत राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आंतरमंत्रालयीन समितीने २७ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांतून ५०० तालुक्यांची निवड केली आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यातील २७ तालुक्यांमूधन द्वितीय क्रमांक, पश्चिम विभागातील ६९ तालुक्यांमधून २ रा क्रमांक, तर संपूर्ण भारतातील ५०० तालुक्यांमधून चिखलदरा तालुक्याने २८ वा क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्र मध्ये २७ तालुक्यांमधूनही द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच धारणी १३९ क्रमांकावर आहे.तसेच हा डेल्टा रँकिंगमध्ये राज्यातून पहिल्या क्रमांकावर कारंजा वर्धा, दुसऱ्या क्रमांकावर चिखलदरा अमरावती, तिसऱ्या क्रमांकावर तळोदा नंदुरबार, चौथ्या क्रमांकावर किनवट नांदेड आणि पाचव्या क्रमांकावर नवापूर नंदुरबार ने स्थान पटकावंले आहे.केंद्र सरकारच्या नीती आयोगाकडून प्राप्त झालेल्या एकुण ४० निर्देशंकांपैकी चिखलदरा तालुक्यात ४० निर्देशांक १०० टक्के साध्य करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. गरोदर मातांची पहिल्या तिमाहीत १०० टक्के नोंदणी करणे, तालुक्यामध्ये ३० वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्यांची १०० टक्के उच्च रक्तदाब तपासणी करणे, या वयोगटातील नागरिकांची मधुमेह तपासणी करणे, तालुक्यातील १०० टक्के गरोदर मातांना आणि 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना नियमितपणे पोषण आहार देणे, SAM व MAM मुलांचे प्रमाण कमी करणे, भूधारकांना मृदा आरोग्य कार्डचे वितरण करणे, तालुक्यातील १०० टक्के बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, सर्वांना मोफत घर, पाणी, विज मिळावी आदी कामे सुरू आहेत.आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगाच्या निर्देशानुसार संकल्प सप्ताह, चिंतन शिबीर, संपूर्णता अभियान इ. महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. तालुका विकास आराखडयानुसार टीबीमुक्त गाव, सुदृढ माता-सुदृढ बाळ, लढा रक्तक्षयाविरुद्ध, सुंदर माझा दवाखाना, उच्च रक्तदाब व मधुमेह संदर्भात तपासणी व उपचार, यशस्वी स्तनपानाच्या पद्धती आणि शिशु संरक्षणाच्या संदर्भाने जनजागृती, पोषण अभियान, पौष्टिक आहार मेळावा, किशोरी हितगुज मेळावा, मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती, बालविवाह मुक्त भारत मोहिम, पोषण परसबाग निर्मिती, कुपोषणमुक्त गाव, विशेष गरजा असणाऱ्या बालकासाठी प्रत्येक शाळेवर प्रशिक्षित शिक्षक, शालेय परसबाग निर्मिती, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, लोकसहभागातून शाळांचे संवर्धन, शाळा व्यवस्थापन समिती कार्यान्वित, गाव बाल संरक्षण समितीची बांधणी, मुलींना मोफत सायकलीचे वाटप, मृदा आरोग्य पत्रिका वितरण, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, लाळ खुरकत रोगाविरुद्ध जनावरांचे लसीकरण, जलसंधारण आणि जलसंवर्धनासाठी विविध योजनांचे अभिसरण, हर घर जल अंतर्गत नळाची जोडणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, बँकिंग टच पॉईंट्सची निर्मिती, प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान, महिला स्वयंसहायता समुहाची बांधणी आणि फिरत्या निधीचे वितरण इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
नीती आयोगामार्फत सुरु करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र हे सातत्याने आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत. तसेच या यशाबद्दल अभिनंदन सुद्धा केले. ज्यामुळे तालुकास्तरावरील प्रगतीचा वेग वेगवान करण्यासाठी संबंधित शासनाचे सर्व विभाग आणि विविध विकास भागीदारासोबत काम करून तालुक्याच्या स्थितीत सुधारणा करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुकास्तरावर गट विकास अधिकारी हे कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभाग पोषण विभाग शिक्षण विभाग, कृष, सामजिक सामावेश, या विभागांतील सर्व विभाग प्रमुख यांनी हे यश प्राप्त करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तालुकास्तरावरील सर्व विभागप्रमुख आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रम समन्वयक म्हणून नियुक्त असलेले आकांक्षित तालुका फेलो अतुल खडसे हे तालुका विकास आराखडा राबविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.