सेवानिवृत्तीनंतर चौथ्याच दिवशी गुरूजींचे प्राणपाखरू उडाले !सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साश्रू नयनांनी दिला होता निरोप...
राजु भास्करे / अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
३० नोव्हेंबर रोजी आपल्या लाडक्या शिक्षकाला सेवानिवृत्तीचा निरोप देताना विद्यार्थी ढसाढसा रडले अन् याच गुरूजींचे दुर्दैवाने चवथ्याच दिवशी हृदयविकाराने निधन झाले ही हृदयद्रावक घटना अकोट तालुक्यातील आदिवासी भागातील शहानूर या गावी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सध्याचे बहुतांश शिक्षक आदिवासी भागात सेवा देण्यास टाळाटाळ करतात. मात्र शहानूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले देविदास भास्कर गुरुजी यांनी सुरुवातीपासूनच आदिवासी भागात सेवेचे व्रत घेतले आणि ते पूर्ण सुध्दा केले गेल्या ३० नोव्हेंबर रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले दरम्यान शाळा व गावकऱ्यांतर्फे त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा ठेवण्यात आला होता.त्यामुळे सर्वच विद्यार्थी या कार्यक्रमात ढसाढसा रडले. पुढील आयुष्य समाजसेवेसाठी जगू, असा मनोदय गुरुजींनी यावेळी व्यक्त केला होता. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते अन् सेवानिवृत्तीच्या चौथ्याच दिवशी म्हणजे ४ डिसेंबरला पहाटे देविदास भास्कर गुरुजी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे प्राणपाखरू उडून गेले. या घटनेमुळे आदिवासी भागासह शिक्षण क्षेत्रात दुःसख व्यक्त करण्यात येत आहे.
____________________________________
हाडाचे शिक्षक अन् समाजशील व्यक्त्तिमत्त्व...
भास्कर गुरुजींचा स्वभाव प्रयत्नवादी, समाजाभिमुख, भिल समाजाच्या एकसंघटतेसाठी नियमित पुढाकार घेणे, सर्वांना सामावून घेऊन दिशा देणे, ते आदिवासी भिल समाज विकास समिती महाराष्ट्रचे अध्यक्षहोते. गुरुजींचे निधन हे अप्रिय आणि मनाला चटका लावणारे असून आदिवासी भिल समाजाची मोठी हानी झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.