मुलींनीच केला पत्रकार बापाचा अंत्यविधी...आर ओ मिश्रा सर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन...


 
मुलींनीच केला पत्रकार बापाचा अंत्यविधी...आर ओ मिश्रा सर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

स्थानिक दि न्यू इरा हायस्कूल आणि महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उप प्राचार्य तसेच पत्रकार आर ओ मिश्रा सर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. २ डिसेंबर रोजी जळगाव जामोद येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्या दोन अविवाहित मुलींनीच त्यांचा अंत्यविधी सोपस्कार पार पाडला.रामेश्वर मिश्रा सर यांनी शिक्षकी पेशा सोबतच पत्रकारितेचे व्रत घेतले होते गेल्या ४० वर्षापासून ते जळगाव जामोद मध्ये पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते यादरम्यान त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये तालुका प्रतिनिधीचे काम केले. लोकमत समाचार मध्ये सुद्धा त्यांनी दहा वर्ष तालुका स्तरावर काम पाहिले.त्यांना दोन मुली व एक मुलगा होता. मुलगा नेहमी बाहेरगावी असायचा आणि तिकडेच त्याचे निधन सुद्धा झाले होते त्यामुळे दोन मुली अनिता आणि नीता समवेत रामेश्वर मिश्रा सर हे जळगावत राहायचे त्यामुळे मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी मिश्रा घराण्यातील वारस नसल्याने मोठी मुलगी अनिता तिने पुढे होऊन टिटव धरले तर दुसरी मुलगी निता हीने खांदा दिला. या दोन्ही मुलींनीच पुढाकार घेऊन त्यांचा अंत्यविधी पार पाडला. आणि मुलगा नसला तरी मुली सुद्धा मुलाची भूमिका पार पाडू शकतात हे सर्वांना दाखवून दिले.मिश्रा सर म्हणजे पत्रकारांसाठी ते चालते बोलते विद्यापीठ होते सर्वांना नेहमी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी सदैव केले,शिक्षकी पेशात असताना ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी केले. अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले त्यांचे विद्यार्थी आजही मोठमोठ्या होत्या वर कार्यरत आहेत सर्वत्र सुपरीचीत आणि परोपकारी असे व्यक्तिमत्व हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये बरेच लोक सहभागी झाले होते.

Previous Post Next Post