ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर रुग्णसेवेत रुजू..खामगावमध्ये पहिली कार्डीयाक ॲम्बुलन्स दाखल, आता 24 तास वैद्यकीय सेवा, उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला महिलेला जीवदान...


 
ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर रुग्णसेवेत रुजू..खामगावमध्ये पहिली कार्डीयाक ॲम्बुलन्स दाखल, आता 24 तास वैद्यकीय सेवा,  उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला महिलेला जीवदान...

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

खामगाव येथील डॉ.निखील संजय ठाकरे व डॉ. सौ. पूजा निखिल यांच्या ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअरचा शुभारंभ रविवार दि.15 डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प.पू.शंकरजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.  खामगावमध्ये प्रथमच पहिली कार्डीयाक ॲम्बुलन्स ठाकरे हॉस्पिटलने रुग्णसेवेत आणली असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सुद्धा  महाराजांच्या हस्ते करण्यात आले.रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हा मुलमंत्र जपत रूग्णांना निस्सीम भावनेने वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प ठाकरे परिवाराने केला आहे.त्या अनुषंगानेच खामगाव शहरातील जावंधिया कॉम्प्लेक्सच्या बाजुला, सिव्हिल लाईन केला नगर येथे सुसज्ज सुविधांसह ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअर रुग्णसेवेत  रुजू झाले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ.निखिल संजय ठाकरे एम म.बी.बी.एस (एम.डी) डी.टी.एम.एच , सीपीएस (मेडीसिन),(एफ.आई.सी.एम)(एफ.आई.डी.एम) ,पी.जी डिप्लोमा कार्डियोलॉजी  कंसलटेंट इंटेंसिव केयर फिजिशियन , कार्डियोलॉजिस्ट , डायबेटोलॉजिस्ट तसेच  डॉ.सौ. पूजा  निखिल ठाकरे एम.बी.बी.एस., एम.एस. कंसलटेंट गायनेकोलॉजीस्ट (प्रसुति व स्त्री रोग तज्ञ) ह्या वैद्यकीय सेवा देणारे आहेत.

विविध आजारांवर होणार उपचार...

ठाकरे हॉस्पिटलमध्ये  डिफिब्रीलेटर, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज अतिदक्षता विभाग, वेंटीलेटर,  मल्टी पॅरामॉनीटर, डिजीटल एक्स-रे, इ.सी.जी.,  फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेची तपासणी (PFT),  दुर्बीणध्दारे फुफ्फुस परीक्षण, अॅलर्जी टेस्टींग सेंटर, निद्रारोग तपासणी, डिलक्स/A.C. रुम्स,  सर्व तज्ञ डॉक्टर्सच्या सेवा उपलब्ध असतील. तसेच कार्डियाक ॲम्बुलन्स 24 तास उपलब्ध राहील. हॉस्पिटलमध्ये  उपचार,दमा, अस्थमा, ओलर्जी, सी.ओ.पी.डी, बालदमा व अॅलर्जी, न्यूमोनीया, स्वाईन फ्लु व इतर संसर्गजन्य आजार, क्षयरोग निदान व उपचार, श्वसनक्रिया निकामी होणे (रेस्पीरेट्री फेल्यूअर), रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार,डेंग्यू, मलेरिया, टायफाईड व इतर ताप, मेंदूज्वर, लकवा, मिरगी,विषबाधा अतिसार, अॅसिडीटी व पोटाचे विकार पेशी कमी होणे व रक्तासंबंधी आजार, निद्रारोग व घोरण्याचे यावर उपचार होतील. तसेच डॉक्टर पूजा निखिल ठाकरे या सुद्धा प्रसूती आणि महीलांच्या अन्य आजारांवर उपचार करणार आहेत.रविवारी सकाळी १० वाजता जागृती आश्रम शेलोडी येथील प.पू.शंकरजी महाराज यांच्या शुभहस्ते हॉस्पिटलचा शुभारंभ झाला. यावेळी श्रीमती सीमा संजय ठाकरे, स्वप्निल संजय ठाकरे, सौ.मीनल स्वप्निल ठाकरे, डॉ.निखिल संजय ठाकरे, डॉ.सौ.पुजा निखिल ठाकरे व ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी  शहरातील गणमान्य व्यक्ती आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

डॉ निखिल ठाकरे उच्चविद्या विभूषित...

 डॉ. निखिल ठाकरे यांनी मोठ्या वैद्यकीय संस्थांमध्ये सेवा देऊन अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे. यात  दीनदयाल उपाध्याय सरकारी रुग्णालय, दिल्ली,  आकाश हेल्थकेअर, दिल्ली, किंग्सवे हॉस्पिटल नागपूर,  व्यंकटेश्वर हॉस्पिटल, दिल्ली, CPS मुंबई, वोक्हार्ट हॉस्पिटल,  जेआर डॉ राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, नवी दिल्ली अशा प्रसिद्ध संस्थांमध्ये डॉ. निखिल ठाकरे यांनी वैद्यकीय सेवा दिली आहे. सध्या ते ठाकरे हॉस्पिटल आणि माऊली हॉस्पिटल शेगाव येथे वैद्यकीय सेवा देणार आहेत.

उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला महिलेला जीवदान...

ठाकरे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व क्रिटीकल केअरच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला  एक महिला  पाठीत दुखत असल्याने उपचारासाठी आली डॉ.  निखिल ठाकरे यांनी तिची तपासणी केली. यात सदर महिलेस हार्ट अटॅक असल्याची लक्षणे दिसून आली. त्यामुळे रुग्ण महिलेला लगेच कार्डियाक ॲम्बुलन्सने माऊली हॉस्पिटल शेगाव येथे हलविण्यात आले. तेथे सदर महिलेची  अँजिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी  मोफत करण्यात आली. वेळेवर योग्य निदान झाल्याने महिलेचे प्राण वाचले, त्याबद्दल नातेवाईकांनी डॉ. निखिल ठाकरे यांचे आभार मानले.

Previous Post Next Post