सय्यद शकिल/अकोला...
अकोला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार कार्यकर्ते सैय्यद करामत अली मीरसाहब यांची निजाम-ए-मुस्तफा फाउंडेशन (NMF) ने अकोला जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.निजाम-ए-मुस्तफा फाउंडेशन एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे जी गरीब आणि शोषित लोकांच्या मदतीसाठी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात सदैव तत्पर असते. अकोला शहर विदर्भातील अव्वल रुग्णालयांसाठी प्रसिद्ध आहे, आणि येथे शासकीय रुग्णालयात अनेक वेळा गरीब वर्गातील लोकं दाखल होतात. त्यामुळे, अकोला GMC मुख्य रुग्णालयात दर आठवड्यात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना 'लंगर-ए-गरीब नवाज' (मोफत भोजन) दिले जाते.फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ख्वाजा खान यांनी सांगितले की, हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात 'लंगर-ए-गरीब नवाज' सुरू करण्यात येईल. अकोल्याचे युवा नेते सैय्यद अशफाक अली (अशफाक भाई अकोला) यांना नियुक्ती पत्र देवून करामत अली यांचा गौरव करण्यात आला.या शुभप्रसंगी निजाम-ए-मुस्तफा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ख्वाजा खान, उपाध्यक्ष मोहम्मद जावेद, सरचिटणीस मोहम्मद ओवेस, खजिनदार सैय्यद जहूर, सैय्यद साहिल रज़वी, जोहेब खान, शोएब रज़ा खान, शोएब खान पठाण, रिज़वान टिपू, सबील रज़ा, समीर खान, इनायत अली (मानवाधिकार परिषद) आदी उपस्थित होते.
