पिंपळगाव काळे जि.प. प्राथमिक मराठी केंद्रीय शाळेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्या स्वखर्चातून विद्यार्थ्यांना गणवेश वाटप...
मंगल काकडे/पिंपळगांव काळे...
एक राज्य एक गणवेश या योजनेचा राज्य सरकार फज्जा उडवताना दिसत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे पहिले सत्र संपत आलेले असतानाही विद्यार्थ्यांना गणवेश काही मिळताना दिसत नाही. असे दृश्य पिंपळगाव काळे जिल्हा परिषद शाळांमध्येच नाहीतर विविध ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसत आहे. राज्यातील प्रत्येक विभागात ही विदारक स्थिती आहे. व सरकारला राजकारणातून फुरसत मिळत नसल्याने गोरगरिबांच्या व्यथा त्यांना कुठं दिसणार अशा चर्चा पालकांमध्ये होत आहे. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता पाच महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाची प्रतीक्षा पहावी लागत आहे. तोपर्यंत जिर्ण झालेले फाटके उसवलेला गणवेश घालण्याची वेळ मायबाप सरकारने आमच्या पाल्यांवर आणली आहे. राज्य शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिला जातो. १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील ४५ लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची अंतिम मुदत होती. पण त्यातील अर्ध्या विद्यार्थ्यांना अद्या पण गणवेश देण्यात आला नाही. त्याच अनुषंगाने पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रीय शाळेमध्ये,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,या सर्वांनी चांगला उपक्रम राबवत, त्यांच्या स्वखर्चातून पहिलीतल्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर यांची उपस्थिती होती.