खामगाव येथे कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा व कुणबी समाज सोयरिक पुस्तिकाचे प्रकाशन.समाज बांधवांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे..गजाननराव ढोरे यांच्यासह सदस्यांचे आवाहन...
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज विकास मंडळ खामगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दि 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता खामगाव येथील संत शिरोमणी तुकाराम महाराज सभागृहामध्ये कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा व कुणबी समाज सोयरिक पुस्तिकाचे प्रकाशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे..परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प .गुरुवर्य स्वामी रामभारतीजी महाराज हे राहणार असून सत्कारमूर्ती म्हणून आ. डॉ. संजयजी कुटे,आ.आकाशदादा फुंडकर ,आ.सौ. श्वेताताई महाले हे उपस्थित राहणार आहे. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजेश एकडे, दादासाहेब कवीश्वर, गुलाबराव महाले, विश्वनाथजी तिडके, अनंतराव भारसाकळे, शिवशंकर लोखंडकार, अनिलभाऊ गावंडे, केदारभाऊ ढोरे, केशवराव टोहरे, शालिग्रामजी कळस्कार, पांडव गुरुजी, नारायणराव गव्हाणकर, दयारामजी वानखडे, विश्वनाथभाऊ काळणे, अंजलीताई टापरे, सुखदासजी महाराज गाडेकर, शिवशंकर भारसाकळे, अरुणभाऊ भगत, अनिलभाऊ अंबलकार, वाल्मीकराव ठाकरे, रवींद्रजी भेलके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे..तर कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा व कुणबी समाज सोयरिक पुस्तिकाचे प्रकाशन सोहळ्याला कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अध्यक्ष गजाननराव ढोरे , उपाध्यक्ष श्रीमती विमलताई सु. थोरात, कार्याध्यक्ष राजेंद्रजी काळे, कोषाध्यक्ष दिगांबरराव कवडकार, ज्येष्ठ मार्गदर्शक राजारामजी काळणे, सहसचिव रामेश्वरजी दुतोंडे ,माजी सरपंच दिलीप शेजोळे सह कुणबी समाज समितीच्या सदस्यांनी केले आहे..