बोराळा नजीक दुचाकी व अॅटोत धडक अपघातातील जखमींच्या मदतीला धावले यशवंत काळे...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तहसील अंतर्गत येणाऱ्या बोराळा गावा नजीक ११ डिसेंबर रोजी अॅटो व दुचाकीत धडक होऊन झालेल्या अपघातात तेलखार येथील मजूर व दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले असता याच दरम्यान आमदार केवलराम काळे यांचे सुपुत्र यशवंत काळे जात असतांना त्यांनी तत्काळ जखमींना प्रार्थमिक उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रूग्णालयात पाठवुन डॉक्टरांशी संपर्क करत योग्य ते उपचार करण्याबाबत निर्देश देत नातेवाईकांना माहिती दिली.