टेब्रुसोंडा,बोराळा,आकी,पिपाधरी परिसरातील रस्तावर करावे लागते तारेवरची कसरतच..


 टेब्रुसोंडा,बोराळा,आकी,पिपाधरी परिसरातील रस्तावर करावे लागते तारेवरची कसरतच..

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी..

मागील कित्येक महिन्यापासुन परसापुर बोराळा मार्गे मोरगड, नागापुर या रस्ताचे डाबरीकरणाचे कामे थंड बस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. बोलले जात आहे की परतवाडा येथिल कंत्राटदार यांनी या रस्तावर गिट्टी टाकून ठेवली व कुठेकुठे रस्तावर दबाई करीता टाकून ठेवली आहे. परंतु  जी गिट्टी रस्तावर टाकून ठेवली असुन ति गिट्टी कशी बसी दबाई केली व एका आठवड्यात ती गिट्टी पुर्ण पणे निघून गेली असल्यामुळे या रस्त्यावर गिट्टीच गिट्टी दिसुन येत आहे. तसेच या रस्त्यावर येजा करणा-या टु व्हीलर, फोर व्हीलर यांना तारेवरची कसरतच करीत असल्याचे चित्र दिसत आहे. या रस्त्यावर काम करणारे कंत्राटदारांना कोणाची भिती नसल्यामुळे येथिल कंत्राटदार अधिकारांच्या आशीर्वादाने आपली मनमानी करीत असल्याचे समजले जात आहे. मागिल काही महिन्यांपूर्वी याच रस्त्याची बातमी न्युज पेपर मध्ये प्रकाशित झाली होती परंतु या कंत्राटदाराच्या डोक्यावर अधिका-यांचे हात असल्याने येथिल कंत्राटदार आपली मनमानी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार टेबुरसोंडा,मोरगड,गौलखेडा बाजार या परिसरातील असलेले गावातील नागरीक काही दिवसातच रस्तावर उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

Previous Post Next Post