ईसोली येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली...


 
ईसोली येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

 दिनांक ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी समाजमंदिर व्यवस्थापन समिती, भीम टायगर ग्रुप, व रमाई महिला संघ ईसोली यांच्या वतीने अध्यक्ष राजकुमार गवई, उपाध्यक्ष किरण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्य व समाज बांधव व गावकरी मंडळी व ग्रामपंचायत ईसोली वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी गावाचे प्रथम नागरिक गावचे सरपंच  डॉ. शे. रईस सर, उप सरपंच पती संतोष भागवत, तसेच माजी सरपंच ईसोली सुनील शेळके,खरात सर, सुरेश गवई तसेच ग्रामपंचायत सदस्य समाधान धनलोभे, उपेष गवई,दिपक गवई तसेच बौद्ध बांधव सुखदेव मोरे, सुपराव गवई, द्यानु गवई, मनोहर गवई, बबन गवई, कमलबाई गवई, मंनकर्णा गवई, शकुंतला गवई, मालता बाई गवई इतर महिला मंडळ व सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी व सर्व बौद्ध समाज बांधव उपस्थित होते , सकाळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन किरण मोरे यांनी केली व सांगता चेतन गवई यांनी केली.तसेच  सायंकाळी सर्व समाज बांधव व भगिनी यांनी समाज मंदिरात येवून बाबा साहेबांच्या पुतळ्याचे पूजन करून मेणबत्त्या लावून अभिवादन केले , डॉ. बाबासाहेबांच्या संघर्ष जीवनाचे कार्य चिमुकल्यांनी आपल्या भाषणात वर्णन केले सायंकाळच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईसोली येथील प्रतिष्ठित शिक्षक व भीम टायगर ग्रुप चे मार्गदर्शक महेंद्र गवई सर यांनी केले,कार्यक्रमाच्या यस्वितेसाठी मिथुन गवई, सुमेध गवई व इतर सर्व ग्रुप सदस्यांनी परिश्रम घेतले

Previous Post Next Post