बापुमिया सिराजुद्दीन पटेल महाविद्यालयांमध्ये जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एड्स जनजागृती वर पोस्टर स्पर्धेचे व एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्य द्वारा संचालित बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड.सलीम बी.पटेल साहेब,सहसचिव रब्बानी देशमुख,संचालक प्रा.कय्युम पटेल व महाविद्यालयाचे प्रभारी. प्राचार्य डॉ. एफ. टी शेख,आय. क्यू. ए. सी आणि एनएसएस यांच्या मार्गदर्शनातून आय. सी. टी. सी. सेंटर ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा एड्स या विषयावरती जनजागृतीस्पर् पोस्टर स्पर्धेचे व एचआयव्ही तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी संदीप बंबटकार समुपदेशक व कु कल्याणी कुलकर्णी आय.सी.टी.सी सेंटर ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद हे उपस्थित होते यांनी विद्यार्थ्यांना एड्स विषयी संपूर्ण माहिती दिली व आय.सी.टी.सी सेंटरचे कार्य समजून सांगितले. पोस्टर स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील कु.नमिरा अनम ने प्रथम तर कु.तृप्ती उगले ने द्वितीय तर कु. वैष्णवी जयस्वाल व कु.आयेशा सिद्दिकने तृतीय क्रमांक पटकावला सदर कार्यक्रमाला माननीय प्राचार्य यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर सदर कार्यक्रमाला डॉ.निखिल अग्रवाल,प्रा.पी.एन.बाठे,प्रा.एम.डी.नेतनेस्कर,प्रा.एम.पी.जांभळे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, एचआयव्ही तपासणीमध्ये महाविद्यालयातील संपूर्ण शिक्षक व शिक्षके कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व प्राणिशास्त्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रेड रिबन क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले.