बी एस पटेल महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल व सहसचिव रब्बानी देशमुख उपाध्यक्ष कय्यूम पटेल प्राचार्य डॉ फराह शेख यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या चार दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक सिराजोद्दीन सलीम पटेल यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा उपयोग त्यांच्या भावी आयुष्यामध्ये आपले करियर करण्यासाठी होणार आहे असे सांगितले.ही चार दिवसीय "कौशल्य विकास कार्यशाळा" विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.या चार दिवशीय कार्यशाळेसाठी विद्यापीठ नियुक्त प्रशिक्षक दहा सेशनमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कसा करावयाचा हे शिकविणार आहे.विद्यापीठ नियुक्त प्रशिक्षक डॉ हरिदास आखरे यांनी विद्यार्थ्यांना मोटिवेशन आणि गोल सेटिंग हे विषय शिकविले व प्रत्येक विद्यार्थ्याचे गोल काय आहे हे सुद्धा विचारून घेतले आणि गोल काय असावा याबाबत विद्यार्थ्यांना समजून सांगितले.पुढील तीन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षक वेगवेगळे विषय जसे ग्रुप डिस्कशन रिझ्युम रायटिंग स्किल, इंटरव्यू स्किल, व्हर्बल कम्युनिकेशन नोन व्हर्बल कम्युनिकेशन टाईम मॅनेजमेंट इत्यादी शिकविणार आहे.या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे समन्वयक प्रा डॉ बाबाराव सांगळे,प्रा महेश नेतनासकर डॉ नूर मोहम्मद,डॉ अझरुद्दीन काजी, डॉ शकील खान,प्रा मोहम्मद शोयब,डॉ चेतन पलन,डॉ निखिल अग्रवाल,डॉ आनंद जाधव,प्रा मनोहर जांभळे, प्रा नितीन आसोले, प्रा प्राजक्ता बाठे, प्रा दिपाली सिरसाठ, प्रा सय्यद जोया, प्रा आंबेकर ,प्रा विकास इसोकार, प्रा हिस्सल, प्रा मोहम्मद रिझवान, अमोल वानखेडे,गजानन इंगळे, डॉ गजानन भोपळे, शेख अफरोज, शेख मुसाब ,विशाल दाणे, परेश अवचार, अमोल देवकर , सागर बाहादरे ,सागर खांदे, साजिद देशमुख, जुबेर खान ,शेख जुबेर, आशिष इंगळे, अक्षय तायडे, वसीम देशमुख, मुदसिक पवार ,आनंद उगले व वैभव ताठे व इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.