पिंपळगाव काळे येथील ४५ वर्षिय महादेव दाभाडे बेपत्ता...


 
पिंपळगाव काळे येथील ४५ वर्षिय महादेव दाभाडे बेपत्ता...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथील रहिवासी असलेले महादेव जगदेव दाभाडे वय ४५ वर्षे हे दिनांक २ डिसेंबर सोमवार रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास गावात जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेले असुन महादेव दाभाडे हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे वडील जगदेव दाभाडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद घेत ली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून महादेव दाभाडे रंग निमगोरा उंची पाच फूट सहा इंच अर्धवट डोक्याला टक्कल पडलेले, अंगात राखाडी रंगाचा मळकट शर्ट, काळसर रंगाचा फुल पॅन्ट, पायामध्ये स्लीपर चप्पल असून अशा वर्णाचा व्यक्ती कुठेही दिसून आल्यास किंवा आढळल्यास स्थानिक जळगाव जामोद पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे सदर घटनेचा पुढील तपास पीएसआय अमोल पंडित हे करीत आहेत..

Previous Post Next Post