सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी तर्फे NMMS सराव परीक्षेचे आयोजन...


 सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी तर्फे NMMS सराव परीक्षेचे आयोजन...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

सन 2022, 2023 व 2024 च्या NMMS सराव चाचणीसाठी मिळालेला प्रचंड प्रतिसाद व त्यामुळेच सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी चा NMMS मध्ये लागलेला दणदणीत निकाल लक्षात घेता या वर्षी सुद्धा रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी भव्य NMMS सराव चाचणीचे आयोजन केलेले आहे. दरवर्षीप्रमाणे या चाचणी परीक्षेसाठी सिद्धिविनायक क्लासच्या व्यतिरिक्त तालुक्यातील इतर विद्यार्थी सुद्धा सहभागी होऊन आपल्या NMMS परीक्षेची तयारी पूर्णत्वास नेऊ शकतात. जळगाव जामोद तालुक्यातील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना याद्वारे कळविण्यात येते की ही सराव चाचणी निशुल्क असून त्यासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकाचे वितरण करण्यात येते. या चाचणीतील प्रश्न हे NMMS परीक्षेतील तज्ञांकडून मागविण्यात आल्यामुळे त्याचा विशेष फायदा दरवर्षी विद्यार्थ्यांना दिसून येतो, तरीही सर्व विद्यार्थ्यांनी या चाचणी करता उपस्थित राहण्याचे आवाहन सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी च्या वतीने करण्यात आले आहे

Previous Post Next Post