व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी राजीव वाढे तर कार्याध्यक्षपदी गणेश भड इलेक्ट्रॉनिक विंगच्या तालुकाध्यक्षपदी राजेश बाठे यांची निवड... "पत्रकाराच्या कुटुंबांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी संघटना सदैव कटिबद्ध",_ कृष्णा सपकाळ..
जळगाव (जामोद) प्रतिनिधी....
२६ जानेवारी रोजी जळगाव शहरातील बाजार समिती सभागृहात व्हॉइस ऑफ मीडियाच्या बैठकीत तालुका अध्यक्षपदी राजीव वाडे तर कार्याध्यक्षपदी गणेश भड यांची निवड करण्यात आली आहे .व्हॉईस ऑफ मीडिया संघटना ही देशातील १३१वी संघटना आहे. ह्यापूर्वी एवढ्या संघटना अस्तित्वात असताना आपल्याला नवीन संघटना का निर्माण करावी लागली? याचे उत्तर आता प्रत्येक पत्रकाराला मिळालेले आहे. व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या लढ्यामुळे पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ सुद्धा निर्माण झाले. पत्रकारांच्या निवृत्ती वेतन वाढीचा मुद्दा सुद्धा शासनाने निकाली काढला. काही ठिकाणी पत्रकारांसाठी घरे निर्माण करणे सुद्धा सुरू झाले आहे.. आपली संघटना पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबासाठीच सक्रियपणे कार्यरत आहे. पत्रकारांच्या कुटुंबाचे आरोग्य, मुलांचे शिक्षण ह्यासाठी संघटना सदैव कार्यरत राहील अशी ग्वाही संघटनेचे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी काढले. ते स्वातंत्र्यदिनी दिनांक २६ जानेवारी रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संघटनेच्या तालुका बैठकीत अध्यक्षपदावरून बोलत होते. राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, जिल्हा संघटक काशिनाथ मानकर, सुनील तिजारे, साबीर अली, निलेश राऊत, शौकत भाई यांची सुद्धा ह्यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार तथा एमसीएन चे संपादक राजीव वाढे यांची तालुकाध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी गणेश भड यांची निवड झाल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सपकाळ यांनी केली, त्याचबरोबर साप्ताहिक विंग तालुका अध्यक्ष म्हणून जळगाव उन्नतीचे संपादक शमीम देशमुख, जिल्हा सह. कोषाध्यक्ष म्हणून लोकमतचे जयदेव वानखडे, इलेक्ट्रॉनिक विंगचे तालुकाध्यक्ष म्हणून आर.आर.सी.चॅनलचे राजेश बाठे यांच्या नावाची सुद्धा घोषणा जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी ह्यावेळी केली. प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे यांनी केले तर राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, जयदेव वानखडे, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजीव वाढे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
_______________________________
तालुका कार्यकारिणी:-अध्यक्ष राजू वाढे., कार्याध्यक्ष गणेश भड, सचिव विनोद वानखडे. तालुका संघटक राजकुमार भड, कोषाध्यक्ष सागर झनके , कार्यवाह मोहम्मद फारुख ,उपाध्यक्ष संजय दांडगे ,उपाध्यक्ष गणेश गिर्हे ,सहसचिव गजानन खिरोडकार, सह सचिव मंगल काकडे, सदस्य डॉ.राजेन्द्र तानकर गजानन सोनटक्के, गोपाळ अवचार धानोरा,राहुल निर्मळ आदींचा तालुका कार्यकारणी मध्ये समावेश आहे.
