मातोश्री नथियाबाई विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी-
विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती द्वारा संचलित सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये दोन दिवशीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे होते तसेच ज्येष्ठ शिक्षक शिवदास सोळंके, घोटेकर मॅडम, राजपुत मँडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यालयामध्ये वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांची खो-खो स्पर्धा,मुलांची कबड्डी स्पर्धा, १०० मीटर धावण्याच्या शर्यत स्पर्धा, संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा, लांब उडी,उंच उडी,लिंबु चम्मच, वक्तृत्व स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धा विद्यालयामध्ये घेण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे शिक्षक शिवदास सोळंके,एस डब्ल्यू इंगळे, डी.के सर ,फोलाने सर,अतुल पाटील सर ,उमेश पाटील सर, शुभम कुलट सर, तेजस बोंबटकार, सुवर्णसिंग राजपूत,रामेश्वर कुनगाडे,विशाल वसूलकर उपस्थित होते.
