सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण...


 
सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी....

26/1/2025 रोजी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा नारी शक्ति सेवा फाउंडेशन च्या कार्यालयावर सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच ध्वजाला सलामी देण्यात आली आणि राष्ट्रगीत घेण्यात आले तसेच सुमय्या अली यांनी 26 जानेवारी का साजरी करण्यात येते यावर प्रकाश टाकला तसेच संविधानाचे महत्व सांगितले  यावेळी लहान मुल मुली तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्या नंतर सर्वांना सुमय्या अली नारी शक्ति सेवा फाउंडेशन च्या सर्व टीम च्या वतीने मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले पूर्ण परिसर देश भक्तिच्या गीताने दुमदुमला होता.सुमय्या अली यांनी सर्वांना आवाहन केले की 26 जानेवारी आणि 15 आँगष्ट यासारखे कार्यक्रम सर्वांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Previous Post Next Post