नगर परिषद महात्मा फुले माध्यमिक कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न...


नगर परिषद महात्मा फुले माध्यमिक कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद शहरातील नगरपरिषद माता आणि माध्यमिक कन्या विद्यालयात शाळेच्या दिनांक १५ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले, शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासन अधिकारी वाहिद सर, गटविकास अधिकारी मोरे साहेब, नगरपरिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला . यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित नाटिका तसेच विविध नृत्य सादर करण्यात आले.तसेच मोबाईलचे दुष्परिणाम काय यावर आधारित नाटिका सादर करण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मने सर यांनी सांभाळले तर सर्व कार्यक्रम रावळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक राठोड सर, वूईके सर, नायसे सर, पतंगे सर, डुकरे मॅडम, खवणे मॅडम, दंडे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले...

Previous Post Next Post