परवाना नसलेले १२ सागवान दरवाजे वनविभागाच्या हाती... पिंपळगाव काळे येथील मंगेश मानकर यांच्या तक्रारीवरून केली वनविभागाने कारवाई...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यामध्ये वनविभाग गाढ निद्रेमध्ये असल्याने तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनांची हानी, अवधै वृक्षतोड, विनापरवाना लाकडांची वाहतूक सध्या आर्थिक देवाण-घेवाणीतुन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिगाव प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या नवीन गोळेगाव खुर्द येथील निर्मानाधीन असलेल्या शाळेवर जवळपास २० ते २२ सागवान चे दरवाजे कोणताही वाहतूक परवाना व दरवाजावर हॅमर उमटलेला नसलेला माल पिंपळगाव काळे येथील रहिवासी असलेले मंगेश मानकर यांनी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी जळगाव उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालय बुलढाणा यांना दिलेल्या लेखी तक्रारीवरून आज दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी गोळेगाव खुर्द येथील शाळेवर तक्रारदाराच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी कुठलाही वाहतूक परवाना व दरवाजावर हॅमर नसलेले १२ ते १५ सागवान दरवाजे मिळून आले. त्याची अंदाजे किंमत लाखोंच्या घरात आहे. एवढा मोठा सागवान चा साठा गैरमार्गाने एका शाळेसाठी जातो तरीही येथील वनविभागाला याविषयी कोणतीच माहिती मिळत नाही हा मोठा प्रश्नच आहे. जळगाव जामोद येथील वनविभाग कार्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील कुलर पुनरनिर्माणाधीन गावामध्ये सागवान चे अनधिकृत पणे गैर मार्गाने शाळेसाठी दरवाजे आणले जातात व याची माहिती वनविभागाला होत नाही. तक्रारदार असलेले मंगेश मानकर यांना याबाबत तक्रार द्यावी लागते व त्या तक्रारीची दखल वरिष्ठांच्या दबावात तब्बल १ महिन्यानंतर घेतली जाते. जळगाव जामोद येथील वन कर्मचारी हे पूर्णतः भ्रष्ट असल्याचे या प्रकारातून दिसत आहे तसेच तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या झाडांची कत्तल होत असून व मोठ्या प्रमाणात रात्रीच्या सुमारास अनधिकृत रित्या गैर मार्गाने पैशाची देवाण-घेवाण करून लाकडाने भरलेल्या गाड्या सोडल्या जातात. तसेच सातपुडा पर्वतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंद तस्करी होत आहे. याकडेही जळगाव जामोद वन विभाग डोळे मिटून आर्थिक देवाण-घेवाण करून हे सर्व प्रकार घडू देत आहे. यावर वरिष्ठांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे ज्यामुळे सातपुडा पर्वतातील वनसंपदा वाढेल नाहीतर सध्या सातपुडा अवैध वृक्षतोडीने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
